Hi Friends
Today, 20th Dec 2013, MPSC has released final answerkeys for Rajyaseva Main exam 2013.
Here are details: PDFs
Hi Friends
Today, 20th Dec 2013, MPSC has released final answerkeys for Rajyaseva Main exam 2013.
Here are details: PDFs
Hi Friends
Many of you would be going to attempt STI Prelims paper on 22 Dec 2013.
Here are tips for the same. Do your level best to manage the time according to these suggestions: Tips on how to solve STI Prelims paper 2013
Good luck to you all!!!
Hi Friends
Today, MPSC has declared REVISED result for Asst Prelims 2013
The cut offs also have gone down. Plz check complete details HERE.
Hi Friends
Today, 10th Dec 2013, MPSC has released answer keys of PSI Mains 2013 exam that was conducted on 8th Dec 2013.
Here are the details: Click HERE
मित्रांनो,
सक्सेस मंत्र देण्याचा उपक्रम कशासाठी आहे? तुम्हा लोकांना सफलता मिळवण्यासाठी माझी मदत व्हावी म्हणून!!! खालील गोष्टी वाचतांना त्या फार सामान्य वाटतील परंतु त्याकडे बऱ्याच जनांचे दुर्लक्ष होत असते म्हणून एक आठवण करून द्यावी म्हणून लिहितोय.
एक लक्षात घ्या… कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी निरंतर प्रयत्न करावे लागतात व कष्ट सुद्धा. पुढील जीवनात आनंद घ्यायचा असेल आणि पुढील जीवन सुखात घालवायचे असेल तर आज रोजी फार कष्ट घ्यावे लागतात.
आपण बघतो कि सोल्जर (सैनिक) किंवा कमांडो आपले काम किती तत्परतेने, जास्त वेळ न लावता अचूक करतात; ते काम कितीही कठोर असले तरीही !!! का बरे ?
त्यांच्या ट्रेनिंग बद्दल ज्याला माहिती आहे तोच हे जाणतो. सैनिकांच्या व कमांडोजच्या ट्रेनिंग मध्ये त्यांना अगदी कठोर परिश्रम करावे लागतात. दिवस-रात्र (झोपण्याची वेळ सोडून) त्यांचे ट्रेनिंग चालूच असते. त्यासाठी शारीरिक ट्रेनिंगसुद्धा तशीच मिळते. त्यांना कितीही त्रास झाला तरीसुद्धा ती टास्क पूर्ण करावीच लागते. गुडघ्यातून, हाताच्या (elbow) कोपरातून कितीही रक्त निघाले तरीसुद्धा त्यांना दिलेली टास्क पूर्ण करावीच लागते. त्याचा फायदा त्यांना त्यांच्या पुढील जीवनात (नौकरीत) होतो आणि ते न थकता दिलेले काम योग्य रीतीने पूर्ण करू शकतात.
तुम्हाला सुद्धा युपीएससी किंवा एमपीएससीची कोणतीही परीक्षा असो, क्लियर करण्यासाठी निरंतर, अथक परिश्रम घ्यावेच लागतात. दररोजचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बाकीचे सर्व काही विसरून फक्त अभ्यास, अभ्यास आणि अभ्यासच करावा लागेल; झोप येईपर्यंत तेच आणि तेच करावे लागेल.
तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला न थकता अभ्यास करावाच लागणार आहे. कारण त्यामुळेच तुम्हाला भावी जीवनात अधिकार, स्टेटस, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आर्थिक सुरक्षा मिळेल.
जितक्या लवकर तुम्हाला ही गोष्ट समजेल ते तुमच्यासाठी चांगले होईल.
अभ्यास करतांना तुम्हाला कितीही शारीरिक किंवा मानसिक यातना झाल्या तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करावेच लागणार आहे. अभ्यास करतांना हे सर्व विसरून शांतपणाने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे लागेल. ह्याची मदत तुम्हालाच होईल, अभ्यासातही आणि परीक्षेतही. लक्ष केंद्रित करावयाचा सराव होईल आणि त्याचा फायदा पेपर सोडवण्यासाठी १००% होईल. अशा सरावामुळे तेव्हा तुम्ही भलताच विचार करत बसणार नाहीत (जसे : प्रश्न किती कठीण आहेत? सर्व प्रश्न मी सोडवू शकेल का? माझे उत्तर बरोबर असेल का? मला किती मार्क्स मिळतील, कट ऑफ किती राहणार आहे? निगेटिव्ह मार्किंगमुळे माझे गुण कमी होतील का? वगेरे वगेरे).
अभ्यास करण्यापुर्वी तुमचे धेय्य निश्चित करा: उप जिल्हाधिकारी व्हायचे कि पी एस आय व्हायचे? राज्यसेवा द्यायची कि एस टी आय /पी एस आय परीक्षा द्यायची?
आणि एकदा ते केले कि त्यावरच फोकस करा.
शेवटपर्यंत योजनाबद्ध व कार्यक्षम (एफिशियेंट) राहावे, नियोजनानुसारच अभ्यास करत राहावे. तुमच्यात काय कमतरता आहे, तुम्ही कशात कमी पडता ह्याचे भान ठेवून त्यावर मार्ग शोधा आणि मग अधिक परिश्रम करून त्यावर मात करा.
नेहमी विचार करा कि “मी खूप बुद्धिमान आहे, हुशार आहे आणि मला ज्ञानाची व वेळेची किंमत माहित आहे. म्हणुनच मी जो अभ्यास हातात आहे तो मी वे वेळेवरच पूर्ण करणार आहे.” मग त्या क्षणी करत असलेल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आजचा अभ्यास आजच पूर्ण करा.
तुम्ही स्वत: तुमचे समीक्षक/टीकाकार व्हा आणि वेळ आली तर स्वत:वर दया करू नका. जे करायचे ते वेळेवर पूर्ण कराच करा, काहीही झाले तरी. नेहमी हाच विचार करा कि “अभ्यासासाठी मी ह्यापेक्षाही जास्त वेळ देवू शकतो. जितका वेळ निघतो त्यापेक्षाही जास्त वेळ मी काढू शकतो.” … काढा आणि काढूनच दाखवा स्वत:ला. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अभ्यासाठी जास्त वेळ देवू शकाल. हे करण्यासाठी कितीही परिश्रम लागले तरीही…कितीही त्रास झाला तरीही.
एक गोष्ट मात्र विसरू नका…. नो पेन नो गेन (No Pain No Gain)…
Hi Friends,
Update: 21 Nov 2013 : Some people are trying to mislead the survey so I am taking it off.
Here is the survey taken by 317 people:
Hi Friends
Online application system has started functioning for MPSC PSI Mains 2013. Apply NOW
मित्रांनो,
खूप दिवसांपासून मला स्वत: ह्या बाबतीत सांगायचेच होते कारण खूप उमेदवार ही चूक करू शकतात जी त्यांनी करायला नकोय.
ह्या ब्लोगवर तुम्ही बऱ्याच जणांचे प्रश्न वाचत आलात आणि त्यावर माझे उत्तर सुद्धा. प्रश्न असे असतात कि “माझा ह्या परीक्षेत इतका स्कोर आहे मी इंटरव्यू साठी तयारी करू का?” , “मी इतका स्कोर असल्यामुळे ही परीक्षा पास/क्लियर होईल का?” वगेरे वगेरे.
मित्रांनो, एक लक्षात घ्या कि असे प्रश्न विचारण्यामागे त्यांचे तात्पर्य काय असते? एक तर त्यांना झालेल्या परीक्षेत चांगले गुण मिळालेत म्हणून पुढील परीक्षेसाठी तयारी करण्याची गरज वाटत नाही नाही तर परत एकदा कठीण परिश्रम करण्याची मनाची तयारी नसते.
ह्यावरच आहे हा सक्सेस मंत्र #7 – Do Not Wait.
मित्रांनो, प्रत्येक परीक्षा झाल्यावर तुम्हापैकी प्रत्येकाने २ ते ४ दिवसांचा ब्रेक घ्यायलाच पाहिजे हे माझे स्वत:चे मत आहे. तुमची एनर्जी भरून निघाली पाहिजेच. झालेल्या परीक्षेत तुम्ही सफल व्हायलाच पाहिजे हि तुमची आणि माझीसुद्धा इच्छा असते.
तुम्हाला चांगले गुण मिळाले किंवा मिळतील (झालेल्या परीक्षेत) तर चांगलेच आहे ना परंतु तुम्ही त्याचा रिझल्ट येईल पर्यंत वाट पाहू नका असे माझे मत आहे. पुढील वर्षाच्या तयारीला लागा कारण हातात असलेली वेळ निघून जावू नये. आता पर्सेंटाइल पद्धत लागू झाली आहे आणि तुमचे इंटरव्यूसाठीचे सिलेक्शन तुमच्या गुणावर आधारित तर आहेच पण त्याही पेक्षा “सर्वात जास्त गुण ” मिळवणाऱ्या उमेदवारावर आहे. असेही होईल कि एकच गुण संख्या असणारे अनेक उमेदवार असतील. मग तेव्हा खरी ती प्रतियोगिता ठरेल.
लक्षात घेण्यासारख अजून एक आहे कि समजा तुमचे इंटरव्यूसाठी सिलेक्शन झाले परंतु तुम्हाला फायनल रिझल्ट मध्ये स्थान मिळाले नाही किंवा फायनल रिझल्ट मध्ये हवे ते पद मिळाले नाही तर!
तुम्हाला जे पद हवे आहे ते मिळवण्यासाठी निश्चितच पुढील परीक्षा द्यावी लागेल !
ह्या वेळी तुम्हाला फायनल रिझल्ट मध्ये स्थान मिळाले नाही तर निश्चितच पुढील परीक्षा द्यावी लागेल !
असे होवू शकते कि :
मग अशा परिस्थितीत वेळ घालवणे योग्य नाही. त्यासाठी काय करावे?
मित्रांनो, जरा विचार करा वरील गोष्टींचा आणि मगच ठरवा काय करायचे ते!
Hi Friends
MPSC has released notification (advertisement) for PSI Mains 2013 exam. Those who have cleared PSI Prelims 2013 should apply online from tomorrow i.e. 12th Nov 2013. The last date of application is 22 Nov 2013.
For details read this:PSI-Mains-2013