Success Mantra #10 – How to solve GS II CSAT (RS Prelims)

मित्रांनो,

आता आजचा आणि उद्याचाच दिवस बाकी आहे राज्यासेवेच्या पूर्व परीक्षेला तर तुमच्या मनात बहुतेक हा प्रश्न गोंधळ घालत असेल कि GS II (CSAT) मधील कोणते प्रश्न अगोदर आणि कोणते नंतर सोडवायचेत, बरोबर?

ह्या पेपरसाठी 2 तास (120 मिनिटे) आणि 80 प्रश्न सोडवायचे असतात. प्रश्न क्रमांक 74 ते 80 ह्या 7 प्रश्नांचे उत्तर जरी चुकले तरी त्यांचे गुण कमी केल्या जात नाहीत.

ज्यांना गणित व बुद्धिमापन विषयात  काहीच अडचण नाही त्यांनी ह्या दोन विषयांशी संबंधित प्रश्न अगोदर सोडवावेत कारण त्यांचा वेळ वाचेल. इतरांनी खालील क्रमाणे प्रश्न सोडवलीत तर चांगले गुण मिळू शकतात. माझा हा एक सल्ला आहे, ज्यांना जसे प्रश्न सोडवायचे असतील त्यांनी त्यांच्या पद्धतीने सोडवावीत.

  1. डिसिजन मेकिंग चे प्रश्न सर्वात आधी सोडवावेत कारण त्यांना निगेटिव्ह मार्किंग लागू नाही.
  2. आकलन (उताऱ्यावरील प्रश्न)  – प्रथम उतारा किती मोठा आहे हे त्यावरील प्रश्न पाहून कळेल.
  • जर 3 प्रश्न असतील तर त्याला 5 मिनिटे द्यावेत.
  • जर 4 – 5 प्रश्न असतील तर त्याला 7 मिनिटे द्यावेत.
  • जर 6 प्रश्न असतील तर त्याला 8 मिनिटे द्यावेत.

एक उतारा घेवून त्यावरील प्रश्न अगोदर पाहून घ्यावेत आणि मग उतारा वाचावा म्हणजे लगेच उत्तरांना अंडरलाईन करता येईल आणि तसे करावे सुद्धा. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर काय असू शकते करत करत संपूर्ण उतारा वाचून झाला कि  मग प्रश्नांची उत्तरे मार्क करावीत.

असे करता करता सर्व उतारे सोडवावेत म्हणजे जास्तीत जास्त गुण मिळण्याची शक्यता निर्माण होईल.

  1. एखादा प्रश्न अगदी सोपा वाटत असेल तर सावधान !!! तुमचे उत्तर परत एकदा तपासून बघा आणि मगच उत्तर पत्रिकेत मार्क करा.
  2. प्रश्न कितीही कठीण वाटत असला तरी पहिल्यांदा त्याला सोडू नका. सोडवण्याचा प्रयत्न करा पण जर 40सेकंदात सोडवता नाही आला तर सोडून द्या. नंतर वेळ मिळाला तर सोडवा अन्यथा तसाच राहू द्या.
  3. सर्व सोपे वाटणारे प्रश्न अगोदर सोडवा.

खालील प्रमाणे वेळेचे नियोजन ठरवा:

  • ८० प्रश्नांना १२० मिनिटे असतात. सुरुवातीचे ५ मिनिटे – पेपर चेक करा. १५ मिनिटे शेवटी रिविजन साठी ठेवा.
  • १०० मिनिटात ८० प्रश्न सोडवायचेत तर प्रत्येक प्रश्नाला १ मिनिट १५ सेकंद मिळतील परंतु एक प्रश्न ५० सेकंदात सोडवण्याचा प्रयत्न करा. दुसरा राउंड कराल तेव्हा प्रत्येक प्रश्न २५ सेकंदात सोडवायचा प्रयत्न करा.
  • जर खूप कठीण प्रश्न असेल तर सोडून द्या व पुढे जा.
  • उत्तर बद्दल शंका असेल तर २ चुकीचे उत्तर एलीमिनेत करा आणि मग उरलेल्या २ उत्तरातून योग्य (योग्य) उत्तर निवडा. दोन्हीही बरोबर वाटतील परंतु अचूक उत्तर एकच असेल ते निवडा.
  • घड्याळीकडे लक्ष ठेवत चला. ठीक ४:४५ वाजता रिविजनला सुरुवात करा. राहून गेलेले प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा.
  • अशा वेळेस टेन्शन येते पण थंड मोठे श्वास घ्या आणि लक्ष केंद्रित करून प्रश्न सोडवा.
  • मध्ये मध्ये हात व पाय स्ट्रेच करा व सोडा. डीप-ब्रेथ घ्या व सोडा.
  • निगेटिव्ह विचार मनात येऊ देवू नका. फक्त पोझीतीव्ह विचार करा आणि प्रश्न सोडवा.

चला मित्रांनो, गुड लक !!!

Posted in MPSC State Services Prelims Exam | Tagged , , , , , , , | 13 प्रतिक्रिया

Free Copy of The Year That Was 2013

Hi Friends

As I said earlier, I am preparing a current affairs eBook (in PDF format).

While preparing the ebook, I realised that it is going to take too much time and it may not get ready for the upcoming Rajyaseva Prelims 2014 which is on 2nd Feb 2014.  So whatever I could do is to release a FREE copy of this ebook tomorrow at 11:30AM. You can download it for FREE and use it for upcoming Rajyaseva Prelims 2014.

A final printed version of this book will be made available by the end of February 2014 and will be priced around Rs.350/- (the cost may vary a bit).

This book will be useful for MPSC Rajyaseva, MPSC PSI, MPSC STI, MPSC Asst and UPSC Civil Services exam.

Do remember to download the FREE copy (eBook) at 11:30AM on 25th Jan 2014.

Here is a screenshot of the book:

TheYearThatWas2013

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | Tagged , , , , , , , , | 9 प्रतिक्रिया

RS Pre 2014 – Time Table and Hall Tickets

Hi Friends

MPSC has issued Hall Tickets for Rajyaseva Prelims 2014. You can print it from your MPSC account.

Time Table for this exam to be held on 2nd Feb 2014 :

2nd Feb 2014 – 1030 AM to 1PM –  GS I

2nd Feb 2014 – 230PM to 5PM – GS II

Carry the following with you:

Hall Ticket

Black Ball Point Pen

More details are available on your HT.

 

 

Posted in MPSC State Services Prelims Exam | Tagged , , , , , , | 12 प्रतिक्रिया

Retotalling

Hi Friends

If you wish to go for Retotalling of your Rajyaseva Mains 2013 marks, login to your MPSC account. Go to Results page and then click “Apply for Retotalling” button available at the bottom of your mark sheet.

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | Tagged , , | १ प्रतिक्रिया

Additional Posts – Rajyaseva 2014

Hi Friends

Here is good news on the eve of New Year !!!

MPSC has increased 75 vacancies for Rajayseva 2014 exam.

Dy Collector – 44 vacancies

Tehsildar – 31 vacancies

Here is original notification about it: AddlPosts-RS-2014

My prediction is once again proved to be 100% correct. Read Here

Posted in MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam | Tagged , , , | 5 प्रतिक्रिया

The Year That Was 2015

Hi Friends

For upcoming MPSC Rajyaseva and STI 2015 exams, we are releasing the book “The Year That Was 2015” in Feb 2016.

This book will be useful for MPSC Rajyaseva, MPSC PSI, MPSC STI, MPSC Asst and UPSC Civil Services exam in 2016.

Here is a screenshot of the book:

 

Book-TheYearThatWas2015

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | Tagged , , , , , , , , , , | 38 प्रतिक्रिया

Marks – Rajyaseva Mains 2013

Hi Friends

Result (Marksheet) is available in your MPSC profile so please check your marks and post here in Comments section so that it will help other candidates to prepare well. Please mention these details:

Your Name:

Roll #:

Marks:

English :

Marathi:

GS I :

GS II :

GS III :

GS IV:

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | Tagged , , , , , | 7 प्रतिक्रिया

Success Mantra #9 – Interview Preparation

हेलो मित्रांनो,

मुलाखत (Interview) बद्दल मला खूप जणांनी विचारले आणि म्हणूनच हा सक्सेस मंत्र लिहित आहे.

सर्वात आधी ज्यांनी मुख्य परीक्षा क्लियर केली त्यांचे अभिनंदन !!!

मित्रांनो,  मुलाखतसाठी कशी तयारी करावी? कोणते प्रश्न येवू शकतात? काय वाचावे? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील, बरोबर?

परंतु ज्या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष असायला पाहिजे तोच प्रश्न बरेचजण टाळतात आणि तेही मुलाखत अगदी तोंडावर येईपर्यंत ! तो प्रश्न म्हणजे मुलाखतीची तयारी केव्हापासून करायला पाहिजे? 

चला तर आधी ह्यावर बोलूया जरा….

मुलाखत काय आहे हे तुम्हाला माहित आहेच. कदाचित काही जणांना माहितही नसेल. ओके. हे बघा, मुलाखत,  तुम्ही काय आहात (?) हे जाणून घेण्यासाठी असते. तुम्ही कसे दिसता, कसे वागता हे बाहेरून दिसतेच परंतु तुम्ही आतून कसे आहात हे जाणून घेण्याचा मार्ग म्हणजे मुलाखत.

मित्रांनो, माझ्या मते मुलाखत हा टप्पा तुमच्या निवडीचा एक सर्वात महत्वाचा भाग असतो. त्यासाठी तुम्ही एक किंवा दोन दिवसांत तयारी करू शकत नाही. त्यासाठी अनेक महिने किंवा वर्ष लागू शकते.

तुम्ही ज्या दिवशी एमपीएससी किंवा युपीएससीच्या परीक्षेच्या तयारीला सुरुवात करता ना त्याच दिवसापासून तुम्ही मुलाखतीचीसुद्धा तयारी करण्यास सुरुवात करायला पाहिजे. मग ते एक वर्षा आधी असो कि दोन वर्षा आधी असो.  का? कारण मुलाखत म्हणजे साधी सोपी गोष्ट  नव्हे.  मुलाखत म्हणजे तुमचे आतील व्यक्तिमत्व काय आहे व तुम्ही काय व कशा प्रकारचा विचार करता हे जाणून घेण्यासाठी असते. तुमचे विषयाचे ज्ञान तर लेखी परीक्षेत तपासल्या जातच असते.

त्यासाठी खालील तयारी करायला वेळ लागतो :

  • युपीएससी असो कि एमपीएससी असो , इंग्रजीला अनन्य साधारण महत्व आहे. मुलाखत मराठीतही देता येते परंतु काही प्रश्न इंग्रजीतून विचारले तर?  इंग्रजीबद्दल मी पुढील सक्सेस मंत्र #10 लिहिणारच आहे; तेव्हा ह्याबाबतीत बोलेन. तो पर्यंत एवढे लक्षात ठेवा कि तुम्हाला मुलाखतमध्ये कमीत कमी स्वत:ला एक्स्प्रेस करता आले पाहिजे. हे करायला वेळ लागतो.
  • एखाद्या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे हे जाणून घेतात तर तुमचे स्वत:चे मत तुम्ही १ ते २ दिवसात डेव्हलप नाही करू शकत म्हणून तुम्हाला मुलाखतीची तयारी फार फार पूर्वीपासूनच करायला पाहिजे. चालू घडामोडींवर लक्ष देवून त्यावर सखोल माहिती गोळा करून त्याचे मनन करून त्यावर स्वत:चे मत तयार करायला अवधी लागतोच.
  • प्रत्येक गोष्टीत तुमचे स्वत:चे मत पोझीटिव्ह्च असायला पाहिजे आणि ते तयार करायला वेळ लागतो.

तर मित्रांनो, घाबरून जावू नका. प्रत्येक गोष्टीसाठी अवधी, मेहनत म्हणजे कष्ट तर पडतातच ना? तुम्ही ब्रेकफास्ट व जेवण करता तर त्यासाठी तुमच्या आवडत्या व्यक्तीला ते तयार करण्यात वेळ आणि कष्ट लागतातच ना!

मुलाखत म्हणजे प्रश्न-उत्तर असेच ना?  

You Are Absolutely WRONG!!!.  

दिसते तसे नसते!  प्रश्न-उत्तर जरी मुलाखतचा एक अभिन्न भाग असला तरी मुलाखतीचा उद्देश वेगळा असतो. त्याला पुढीलप्रमाणे विभागता येईल:

  • बाह्य व्यक्तिमत्व (Outer Personality):  मुलाखत रुममध्ये (Interview Panelमध्ये) एक सदस्य (सायकोलोजीष्ट) असतो. त्याचे काम म्हणजे मुलाखतीसाठी आलेला उमेदवार कसा दिसतो, कपडे कसे घातलेत, कसा चालतो, कसा बोलतो, कसा वागतो, कसा हसतो ह्यावर बारीक नजर ठेवून असतो. तो सदस्य कोण आहे हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही.
  • आंतर व्यक्तिमत्व  (Internal Personality): उमेदवार काय बोलतो, त्याचे स्वत:चे मत काय आहे, तो कोणत्या वेळी काय रिएक्श्न देतो, गोंधळून जातो कि नाही, अचूक निर्णय घेतो कि नाही,  हे सर्व तपासल्या जाते तुमच्या उत्तरातून व तुमच्या Body Language वरून.

मुलाखतीची तयारी केव्हा व कशासाठी हे आपण वर बघितले. आता बघुया कि मुलाखतीची तयारी कशी करावी.

बाह्य व्यक्तिमत्व (Outer Personality):  ह्यासाठी पुढीलप्रमाणे तयारी करावी:

  • फिटनेस व पर्सनालिटी: तुम्ही दिसायला कसेही असो पण फिटनेस महत्वाची असते. विचार करा कि तुम्ही मुलाखत घेताय आणि तुमच्या समोर दोन उमेदवार आहेत. एक उमेदवार आकर्षक आहे पण ओव्हरवेट असून त्याचे पोट सुटलेले आहे. दुसरा उमेदवार दिसायला मात्र तितका आकर्षक नाही परंतु त्याचे पोट सुटलेले नाही व सडपातळ आहे.  ह्या दोघांपैकी तुम्ही कोणाला सिलेक्ट कराल? समजलेना मला काय म्हणायचे आहे? ह्यासाठी तुम्ही तुमची फिटनेस चांगली ठेवा. आठवड्यातून कमीतकमी ३ ते ४ दिवस व्यायाम करा आणि रनिंग करा. तुम्ही कसे दिसता हे आरशात निरखून पहा.  त्यात काय इम्प्रूव्हमेंट करता येईल ते बघा. हेअर-स्टाईल कशी चांगली दिसते हे बघा. हेअरकट चेंज करा, गरज पडल्यास.  मित्रांना विचारा. त्यांनी काही कणखर मत मांडले तर तुम्हाला वाईट वाटू देवू नका. ते तुमच्या चांगल्यासाठीच सांगतील हे लक्षात ठेवा. आणि ह्याचा फायदा तुम्हाला पुढेही होईलच.  Just Imagine! कि तुम्ही ट्रेनिंग करत आहात आणि तिथे तुम्ही साधे धावू पण शकला नाहीत आणि नेहमी नेहमी मागे राहिलात तर तेव्हा कसे वाटेल!!  फिटनेस यायला वेळ लागतोच हे लक्षात ठेवा.
  • चालणे : चालतांना तुमचा पाय आडवा-तिडवा पडत नाही ह्याची काळजी घ्या.  एका सरळ रेषेत चालावे म्हणजे तुमच्या शूज (स्त्री असाल तर चप्पल/सेंडल) चे पुढील टोक एका रेषेत पडायला पाहिजे. असे चालण्याची सवय पाडावी. ह्यासाठीही खूप वेळ लागतो त्यामुळे हा सराव खूप आधीपासूनच करावा.
  • बोलणे: तुम्ही कसे बोलता हे तुमच्या किंवा मित्राच्या/मैत्रिणीच्या मोबाईल मध्ये रेकोर्ड करा आणि मग ते पहा. न अडखळता बोलावे. बोलतांना हातवारे करू  नये व डोकेसुद्धा जास्त हलवू नये. तसे करत असाल तर ते न करण्याची सवय पाडा. बोलत असताना तुमचे हात जराही इकडे-तिकडे फिरवू नये. करत असाल तर हे ठीक करावे. ह्याला सुद्धा वेळ लागतो.
  • कपडे : मुलाखत ही तुमच्या जीवनातील एक अति-महत्वाची घटना आहे. त्यासाठी तुम्ही अगदी एक चांगला ड्रेस तयार ठेवावा. जरुरी नाही कि नवीनच असावा. हे सर्व मुलाखतीच्या एक आठवडा अगोदर करावे.  टाय लावायची सवय पाडा. आठवड्यातून एक दिवस तरी टाय लावून फिरा.  हे करणे शहरातील मुलांना नॉर्मल आहे परंतु खेडेगावातील मुलांसाठी हे नवीनच आहे आणि ते लाजतीलही (Come On डियर, ह्यात लाजण्यासारखे काही नाही). लक्षात ठेवावे कि मुलाखत ही तुमच्या जीवनातील एक अति-महत्वाची घटना आहे. Interview Panel हे बघतेच की ह्या दिवसाचे महत्व तुम्हाला समजते कि नाही आणि ह्या दिवसासाठी तुम्ही काय विशेष तयारी केली आहे. मित्रांनो, ह्याला टाळू नका. हे फार महत्वाचे आहे. खिशात फक्त एक रुमाल असावा. मागील खिशात वालेट (पर्स) ठेवाल तर त्यात जास्त काही ठेवू नका. तुमचे pocket फुगलेले दिसू नये. खिशात गाडीची चावी असेल तर त्यासोबत वाजणारी दुसरी वस्तू असू नये म्हणजे चालतांना आवाज होणार नाही.

आंतर व्यक्तिमत्व  (Internal Personality):  ह्यासाठी पुढीलप्रमाणे तयारी करावी:

  •  आत्म-विश्वास: आंतर व्यक्तिमत्वाची सर्वात महत्वाची पहिली  पायरी म्हणजे आत्म-विश्वास. जो पर्यंत आत्म-विश्वास तुमच्यात नाही तो पर्यंत, तुम्हाला जे हवे, ते बोलू शकत नाही. कोणतीही गोष्ट बोलायची म्हणजे बोलण्यात वजन आणावे लागते. वजन येत नाही, आणावे  लागते. आणि ते कसे येईल? स्वत:वर विश्वास ठेवा. पुढे पाहूया…. समजेलच आपोआप.
  • ज्ञान: कोणत्याही विषयावर बोलायचे असल्यास त्यासाठी लागणारे ज्ञान असावे लागते. कोणताही मुद्दा पूर्णपणे, समर्थपणे मांडायचा असल्यास त्याबद्दल सर्व माहिती असायला पाहिजे. एक मुद्द्याच्या दोन्ही बाजू माहित असावयास हव्या (एक- पोझीटिव्ह, दोन – निगेटिव्ह). कोणत्याही प्रश्नावर दोन्ही बाजूंनी बोलता यावे असे ज्ञान जरुरी असते.
  • सकारात्मक दृष्टीकोन:  आता हे काय? 🙂 एकदम साध्या भाषेत सांगायचे म्हणजे बोलण्यात सकारात्मकता असावी. एक उदाहरण देतो:  तुमच्या समोर एक काचेचा ग्लास आहे आणि त्यात ५०% पाणी आहे.

glass

वरील ग्लास पाहून तुमच्या ओठांवर पुढीलपैकी कोणते वाक्य येईल?

१) ग्लास अर्धा भरलेला आहे.
२) ग्लास अर्धा रिकामा आहे.

जर पहिलं वाक्य आले असेल तर तुमचा दृष्टीकोन सकारात्मक आहे आणि दुसरे वाक्य असेल तर मग नकारात्मक दृष्टीकोन आहे.

आता हा दुष्टीकोन कोणताही असो ह्याचा फायदा काय?

मित्रांनो,  कोणतीही माहिती बोलायची असेल तर ती सकारात्मक पद्धतीने बोलावे म्हणजे तुम्ही पुढाकार घेणार आणि हातात असलेले कार्य तुम्ही पूर्ण करालच असा निष्कर्ष निघतो परंतु नकारात्मक पद्धतीने बोललात तर ते कार्य तुम्ही अर्धवट सोडाल असा निष्कर्ष मुलाखतीत निघू शकतो.

सकारात्मक  दृष्टीकोन फक्त आणि फक्त  सरावानेच येवू शकतो.

तुम्ही जे बोलाल त्यावरून तुमचे व्यक्तिमत्व दिसून येईल.

आता पुढील महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणते प्रश्न येवू शकतात?

  • मुख्य परीक्षेचा फॉर्म भरला होता ना तर त्यातील मुख्य माहितीवर तुम्ही प्रश्न अपेक्षित करू शकता
  • तुमचं नाव जर एखाद्या फेमस व्यक्तीशी मिळतं जुळत असेल तर त्यावर प्रश्न विचारल्या जावू शकते
  • मागील ३ ते ४ महिन्यात घडलेल्या घडामोडी
  • हॉबीज
  • उप-जिल्हाधिकारी (किंवा ज्या पदासाठी इच्छुक आहात ते) व्हायचं का ठरवलं?
  • भाऊ, बहिण, आई  वडील काय करतात?
  • कामाचा अनुभव असेल तर त्यावर प्रश्न?
  • चालू घडामोडी:
    • आदर्श घोटाळा
    • अण्णा हजारे
    • 2G स्पेक्ट्रम घोटाळा
    • Ragging
    • आधार कार्ड
    • जन गणना २०११
    • स्त्री आरक्षण
    • काश्मीर इश्यू
    • वाढती महागाई
    • हंग पार्लीयामेंट
    • RTI
    • काळा पैसा
    • लोकपाल बिल
    • मर्सी प्लीआ
    • Anti-Rape Bill
    • Latest Election Results
    • Naxal Attacks
    • Telangana
    • Land Acquisition Bill
    • Food Security Bill
    • No Vote Option in Election Machine
    • India’s Moon Mission
    • Global Warming and Cooling
    • लोक आयुक्त
    • महत्वाच्या व्यक्ती (Who is Who)
    • अवार्ड्स
    • खेळ विषयक बातम्या

काय वाचावे?

  • खालील मासिके वगेरे वाचून काढा:
    • इंडिया इयर बुक 2014
    • मनोरमा इयर बुक 2014
    • लोकराज्य (मागील काही महिन्यांच्या कॉपीज)
    • योजना
    • कुरुक्षेत्र
    • The Hindu
    • Indian Express
    • Internet
    ज्या दिवशी तुमची मुलाखत असेल त्या दिवशीचे मुख्य न्यूजपेपर्स वाचायला विसरू नका हं !

    लवकरच मी विडीयो द्वारे मुलाखत मार्गदर्शन सुरु करणार आहे म्हणजे तुम्हाला ह्यासाठी कुठेही जायची गरज पडणार नाही. ज्याला हे मार्गदर्शन हवे त्यांनी स्वत:चा विडीयो काढून मला पाठवावा किंवा ह्या ब्लोगवर अपलोड करावा आणि तो पाहून मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल.  ह्याबद्दल पुढील आठवड्यात सांगेल.

ज्यांनी मुख्य परीक्षा क्लियर केली आहे आणि मुलाखतीची तयारी करत आहेत त्यांना बेस्ट विशेस आणि ज्यांनी आतापासून ह्या परीक्षेची तयारी सुरु केली आहे त्यांनासुद्धा Good Luck !!!

तुमचा मित्र

अनिल दाभाडे

२४ डिसेम्बर २०१३

रात्री ९:०७ वाजता

Posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services | Tagged , , , , , , , , , | 8 प्रतिक्रिया

Answer Key – STI Prelims 2013

Hi Friends

MPSC has released answer key for STI Prelims 2013.

Here it is located: https://anilmd.wordpress.com/sti/results/answerkey-sti-prelims-2013/

Posted in MPSC STI | Tagged , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

Result – RS Mains 2013

Hi Friends

Yesterday, 21st Dec 2013, MPSC declared the result of Rajyaseva Mains 2013. It is available here as well as on the MPSC website.

Here is the result: RajyasevaMains2013-Result

Posted in MPSC Rajyaseva Main Exam | Tagged , , , , , , | यावर आपले मत नोंदवा