मित्रांनो, कशी चालू आहे राज्यसेवेची तयारी?
आज प्रत्येकजण गोंधळात पडलेला आहे, मुख्य परीक्षेचा सिल्याबस पाहून, होय ना?
राज्यसेवाच काय एम.पी.एस.सी. च्या प्रत्येक परीक्षेचा सिल्याबस चेंज झालाय/होतोय. मित्रांनो, माणसाचं जीवनच तसं आहे त्यामुळे ह्या चेन्जला स्वीकारा कारण हा चेंज तुमच्यासाठी चांगलाच आहे.
अगोदर काय व्हायचं माहित आहे का? बरेच जण रट्टा मारायचे अभ्यास करतांना आणि ज्यांना हे जमत नव्हतं ते बिचारे अभ्यास करून करून थकून जायचे आणि मग त्यांना मुख्य परीक्षेत सफलता मिळत नव्हती. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर फार बरं झालं असं मला स्वताला वाटते कारण त्यांची इच्छा असायची राज्यसेवेची परीक्षा द्यायची पण descriptive पद्धतीमुळे त्यांना बिचाऱ्यांना फक्त पी.एस.आय., एस.टी.आय., Assistant ह्याच परीक्षेनवरती भागवावं लागायचं. पण आता मात्र फार छान झालंय की ते त्यांची उपजिल्हाधिकारी, डी.वाय.एस.पी. / ए.सी.पी., तहसीलदार, बी.डी.ओ. व्हायची स्वप्नं आता पूर्ण करू शकतील. अशा सर्व मित्रांना माझ्याकडून शुभेच्छा.
माझ्याकडून जितकं शक्य होत आहे ते मार्गदर्शन, माहिती मी पुरवीत आहे. आज ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी तसेच एम.पी.एस.सी. यु.पी.एस.सी. परीक्षेच्या उमेदवारांना मी मार्गदर्शन त्यांच्या घरापर्यंत इंटरनेट व मोबाईल द्वारे पोचवत आहे. मला ग्रामीण भागातील बरीच मुले फोन करतात कि ते इमेल व माझा ब्लॉग वगेरे त्यांच्या मोबाईल वरूनच बघतात/वाचतात. आज माझ्या वेबिनार (ऑनलायीन सेमिनार) मुळे त्यांना घरपोच मार्गदर्शन मिळते. त्यांना पैशांच्या प्रॉब्लेम मुळे ते शहरात जावून मोठा क्लास लावू शकत नाहीत त्यामुळे मला तरी ह्या बाबतीत खूप समाधान आहे कि माझं मार्गदर्शन त्यांच्या कामी येत आहे.
तर मित्रांनो, बदल हा नेहमी असायलाच पाहिजे नाहीतर मग मजाच काय ह! जीवनात माणसाने कोणत्याही गोष्टीला तयार असायला पाहिजे, जसा मी असतो (ह्या बद्दल आपण नंतर बघूया जेव्हा मी म्हातारपणी माझी ऑटोबायोग्राफी प्रकाशीत करेल). अरे मित्रांनो, तुम्ही अजून बघितलंच काय!!! ये दुनिया बडी जालीम है और जो हिम्मत न हारे बस लढता रहे वोही सफल हो सकता है.
“Destiny is not a matter of chance; it is a matter of choice. It is not something to be waited for; but, rather something to be achieved.”
इसीलिये मैं केहता हूं दोस्तों के अगर कुछ पाने की तमन्ना रखते हो तो उसे हासिल करने की कोशिश तो करो, कौन माइका लाल है जो तुम्हे रोक सके! ख्वाब देखना भी है तो आकाश की ऊंचाई तक के देखो, छोटे ख्वाबों मैं क्या रखा है? Aim At Sky and Shoot High!!!
और कुछ मदत चाहिए तो मैं हूं ना!
Share this with your friends and relatives who can benefit from my blog: