हेलो मित्रांनो, GR related to age – Age-201604251548531107
“एमपीएससीच्या विविध परीक्शेंसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 33 वरून 38 वर्षे होणार व मागासवर्गीय उमेदवारांसाठी सध्याची 38 वर्षांची वयोमर्यादा 43 वर्षे होणार”
आज सकाळीच वरील बातमी वाचली आणि हायसे वाटले. 🙂
चला आता अनेक जणांना आपली स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळाली ज्यांची स्वप्ने (वयोमर्यादेमुळे) भंग होणारच होती.
मी हा लेख फक्त आनंद साजरा करण्यासाठीच नाही तर ह्या आनंदात तुम्ही लोकांनी वाहून जावू नये म्हणून लिहितोय. परेशान? हो, चिंतेचीच बाब आहे. तुम्हाला पुढे रडायचे कि हसायचे हे आता तुम्हीच ठरवायचे.
ज्यांनी मागील काही वर्षात एमपीएससी परीक्षेसाठी आपल्या कष्टाचे चीझ केलं नाही (वर्षानुवर्षे मेहनत करूनही) त्यांना व जे उमेदवार नव्याने ह्या परीक्शेंसाठी तयारी करायला सुरुवातच करत आहेत त्यांना मला काही सांगायचे आहे.
आता महाराष्ट्र सरकारने वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाच आहे तर मग आलेल्या संधीचा फायदा तुम्हा लोकांना घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही एकही दिवस वाया घालवता कामा नये.
जरी तुम्ही वारंवार ह्या परीक्षा दिल्या असतील तरी सुद्धा तुम्हाला नव्याने अभ्यासाला सुरुवात करावी लागेल.
ह्या वर्षीचे (राज्यसेवा २०१६) पूर्वपरीक्षेचे दोन्ही पेपर्स बघा, व्यवस्थितपणे बघितल्यास असे दिसून येईल कि ज्यांनी प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास केलेला आहे, त्यांनाच अनेक प्रश्नांची उत्तरे देता आलीत. बरीच उत्तरे त्यांना सुद्धा देता आली नाहीत. पेपर दोन मध्ये तर पुरेसा वेळ मिळालाच नाही उत्तरे देण्यास !!! असे अनेक जण म्हणतात. का? पुढे बघूया…
तर मित्रांनो, एक प्रयत्न करतोय….माझे सजेशन्स तुम्हास उपयोगी पडतील अशी आशा करतो.
- सर्वात आधी मुंगीच्या जीवनाकडे बारकाईने बघा. मुंगीला सर्वसामान्य कीटक समजण्याची चूक सर्वच जण करतात पण ती अफाट सामर्थ्य घेवून जगते आणि हत्तीला सुद्धा कासावीस करून सोडते, माहित आहे ना?
- ह्या पृथ्वीवरील अनेक प्राणी, कीटक, इत्यादी सृष्टीतील सर्वच जीव (मनुष्य सुद्धा)!!! पावसाळा आल्याबरोबर ह्या सर्वांची दाणादाण उडते, बरोबर?
- पण मुंगीला बघा. पावसाळा येईल म्हणून ती बघा आपली काळजी कशी घेते. पुढील तीन चार महिन्यांसाठी आपल्याला जे काही लागणार आहे त्याचा तिला पूर्ण अंदाज असतो आणि ती त्याचप्रमाणे सज्ज होते. बाकी सर्वच जीव आपापल्या कामात/नेहमीच्या जीवनात गुंग असतात पण मुंगी मात्र निमुटपणे आवश्यक असलेल्या सर्व वस्तू जमा करून ठेवायला सुरुवात करते. आजूबाजूला किती गोंगाट असतो पण मुंगी मात्र आपल्या भविष्यासाठी सजग होवून फक्त आपल्या अन्न जमवण्याच्या कामात लक्ष देते. आपले काम ती वेळेच्या आत पूर्ण करते आणि मग जेव्हा पावसाळा येतो तेव्हा सर्वांची दाणादाण उडते परंतु मुंगी मात्र आपले जीवन सुरक्षितपणे जगते.
- मित्रांनो, तुम्हाला सुद्धा असेच करायचे आहे. पावसाळारुपी “एमपीएससी परीक्षा” पुढे येत आहेत आणि त्यासाठी तुम्हाला स्वत:ला सज्ज करायचे आहे.
- ज्या चुका तुम्ही अगोदर केल्यात त्या आता तरी करू नका. वयोमर्यादा वाढते आहे तर ह्या संधीचा दुरुपयोग करू नका. हो, मी असेच म्हणेन. “दुरुपयोग” म्हणजे हातात असलेल्या वेळेचा अयोग्य वापर !
- मुंगी प्रमाणे तुम्हाला जय्यत तयारी करावी लागणार आहे. स्वत:ला एका रूममध्ये कोंडून घ्यावे लागेल. सर्व गोंगाटापासून स्वत:ला दूर ठेवावे लागेल. मोबाईलला दूरच करावे लागेल आणि जेव्हा गरज पडेल तेव्हाच हातात घ्यावा लागेल (बातम्या वाचण्यासाठी अथवा अभ्यासासंबंधित माहितीचे देवाणघेवाण करण्यासाठी व अति महत्वाचे कॉल करण्यासाठी).
- निमुटपणे, नित्यनेमाने, काटेकोरपणे अभ्यास करावाच लागेल.
- राज्यसेवा किंवा युपीएससी चा अभ्यास करण्यासाठी कमीतकमी 415 दिवसांचा अभ्यास करावा लागेल हे विसरू नका.
- स्वत:ला रूम मध्ये कोंडून घेण्याआधी काही महत्वाची तयारी करून घ्यावी लागेल.
- सर्वात आधी, हवे असणारे साहित्य: प्रत्येक विषयासाठी पुस्तके, दहा ते वीस डझन रुल्ड पेपर किंवा कोरे कागद, वेगवेगळ्या रंगांचे पेन्स, फाईल्स, इत्यादी जमवा.
- स्वत:साठी एक रूम (घरातीलच योग्य राहील जर का तिथे गोंगाट नसेल) बघा आणि त्यात टेबल व खुर्ची (सरळ पाठ असलेली). आरामदायक नको. नाहीतर झोपच काढत बसाल 🙂
- कमीत कमी २-३ वर्तमानपत्रे (द हिंदू/लोकसत्ता/महाराष्ट्र टाईम्स) व पाच मासिके (लोकराज्य, योजना/कुरुक्षेत्र/सायन्स रिपोर्टर/सिविल सर्विसेस क्रोनिकल, इत्यादी) सब्स्क्राइब करा. तुमच्या भागात जी मिळतील त्यावर अवलंबून राहू नका.
- परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार जास्तीत जास्त पुस्तके घ्या (राज्यसेवा – 55-60, पी.एस.आय./एस.टी.आय/असिस्टंट – 30-40, युपीएससी- 60-70).
- सरकारी वेबसाईट ची लिस्ट बनवा.
- इंटरनेटवर उपलब्ध असलेली सर्वच काही माहिती खरी नसते. जुनी सुद्धा माहिती असू शकते.
- सर्वच विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी स्वत:चा स्टडी प्लान असावा.
- प्रत्येक विषयांच्या प्रत्येक मुद्द्यांवर सखोल अभ्यासानंतर स्वत:चे नोट्स बनवावे लागतील आणि ते नोट्स सुद्धा योग्यच प्रकारचे असावेत. पानेच्या पाने लिहून ठेवण्यात अर्थ नाही.
- वेळेचे योग्य नियोजन करूनच सर्व विषय कधी-कधी घेवून अभ्यास करायचा आहे ह्याची लिखित स्वरुपात नोंद असावी.
- प्रत्येक मुद्द्याची योग्य प्रकारे मांडणी असावी. टेबल्स स्वरुपात नोंद असावी.
- वर्तमानपत्रे, पुस्तके, मासिके, इंटरनेट रिसर्च इत्यादींची योग्य सांगड घालून साधारण 415 दिवसांचा अभ्यास पूर्ण करूनच परीक्षा द्यावी तरच परीक्षेत यश मिळवू शकाल.
मागील अनेक वर्षांपासून तुमच्यापैकी अनेक जण अयोग्य रीतीने अभ्यास करत होते त्याची सजा त्यांना मिळालीच आहे. काही जणांनी अभ्यास करणेच सोडून दिले होते पण आता वयोमर्यादा वाढतेय तर मग परत अभ्यासाला लागतील. पण. पण.. पण… परत परत तीच चूक करून पुन्हा मिळालेली पाच वर्षे वाया घालवू नका.
हातात आलेली वेळ आता तरी घालवू नका. इतक्या वर्षांच्या अपयशामुळे तुम्हाला कळून चुकलेच असेल कि तुम्हाला आता प्रोफेशनल मार्गदर्शनाची गरज आहे.
परिस्थितीनुसार योग्य तो बदल घडवून आणणे व बदलणे हा निसर्गाचा नियम आहे. आमचा पिजीपी सुद्धा 2016च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेनंतर बदललाय.
- आमच्या पिजीपी मध्ये भरपूर पुस्तके देण्यात तर येतातच (राज्यसेवा – 55-60, पी.एस.आय./एस.टी.आय/असिस्टंट – 30-40, युपीएससी- 60-70) आणि मासिके सुद्धा घरपोच पाठवल्या जातात.
- नवीन स्टडी प्लानमध्ये आता प्रत्येक विषयाच्या प्रत्येक topicसाठी individual मांडणी असून त्यावर दोन-ते-पाच-सात वेगवेगळ्या पुस्तकांमधील माहिती वाचण्यासाठी मार्गदर्शन आहे.
- प्रत्येक sub-topicवर आता सखोल टेस्ट होतील.
- प्रत्येक sub-topicवर सखोल अभ्यास करवून घेतला जाईल.
- करंट अफेयर्स मधील प्रत्येक महत्वाच्या विषयांचा मागील इतिहास चाचपडून त्याच विषयावर/मुद्द्यावर अनेक प्रश्न तयार करून WhatsApp व इमेलद्वारे टेस्ट्स घेण्यात येतील.
- प्रत्येक विषयासंबंधित करंट अफेयर्सची monitoring करून त्यावर सखोल रिसर्च करून मग त्यावर अनेक प्रश्न तयार केले जात आहेत.
- प्रत्येक मुख्य मुद्द्यांवर न्यूज अपडेट केली जात आहे.
एकंदरीत आता पिजीपी, परीक्षेत सफलता कशी मिळवायची ह्यावर आधारित आहे.
इतर काही महत्वपूर्ण आर्टिकल्स:
तुमचा मित्र व गाईड,
Warm Regards,
Anil Dabhade
Director
AD’s IAS Academy
——————————————————————-
Web: http://www.anilmd.com
Blog: https://anilmd.wordpress.com
Call: 9987401168, 8698277829
“If You Light A Lamp For Somebody, It Will Also Brighten Your Own path”…….Lord Buddha


Hi open sati age limit kai ahe
@स्नेहा, ओपन साठी (राज्यसेवा/एसटीआय/सहाय्यक कक्ष अधिकारीसाठी) वयोमर्यादा 38 वर्षे आहे.
sir,me 12th pass aani diploma in teacher education kela ahe tar maze 30 ahe ata tar me mpsc exam deu shakte ka
@Pranali, you need a degree in order to be eligible for MPSC exam(s).
Sir, the age limit for mpsc is increased to 38 for open category But what is the attempt limit for rajyaseva exam?
Pooja
@Pooja, there is no limit on attempts for Rajyaseva.
Sir, I have been following your blog for quite sometime, however I am in a dilemna. I have cleared my Graduation in Commerce stream with a meagre 43-45%. I understand it was due to my carelessness. However, I am keen to know, whether there is any minimum percentage prescribed by MPSC for appearing in their State Level Public Service Commission Exams. I am elated with the decision of State Government to increase the upper age limit of General Candidates to 38. A criteria which I certainly fulfill. I am still unaware of the minimum percentage for Graduation. I have scoured the Internet but couldn’t find any details. Any help would be appreciated.
@Krishna, you should not worry about that as there is no requirement of minimum marks in academic qualifications. You need to score high in the MPSC exams to get selected.
Dear Sir,
Ata maze vay 33 aahe mi obc categary madhe yeto ani mala mpsc pariksha denyachi ichha aahe
mi deu shakel ? mala ata study karta yeil ? mazya kadun study hoil ? jar mi tumch class join kela tar tumhi mala khatri deu shakal ki mi pass hoilch ?
@योगेश, मित्रा, एमपीएससी परीक्षेत सफलता मिळविणे हे उमेदवाराच्या हातात असतं नाहीतर प्रत्येक परीक्षेत सर्वच्या सर्व जागा मोठमोठ्या academyच्या विद्यार्थ्यांनीच भरल्या गेल्या असत्या. माझं काम आहे मार्ग दाखविणे आणि ह्या परीक्षेची तयारी करवून घेणे. ही लिंक वाचावी: https://anilmd.wordpress.com/2013/04/19/success-mantra-2-%e0%a4%b8%e0%a4%ab%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b3%e0%a4%a4-%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b3%e0%a4%b5/
Need FL material for Dy. Collector ad advice for how to do study
@Rahul, you need to join our PGP for study material and personal study plans, etc. Details are available under “Courses” menu.