एमपीएससी ने पुढील घोषणा केली आहे ज्या उमेदवारांनी त्यांची माहिती वेब साईट वर अपडेट न केल्यामुळे त्याना प्रवेशपत्र मिळाले नाही अशा उमेदवारांसाठी:
राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०१३ साठी ज्या उमेदवारांनी त्यांची माहिती वेब साईट वर अपडेट न केल्यामुळे त्या उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र आयोग पाठवू शकले नाही, अशा उमेदवारांची बैठक व्यवस्था (पुढे दिलेल्या PDF मध्ये बघा) काही जिल्हा केंद्रावरील उपकेंद्र/उपकेंद्रावर उमेदवारांच्या आडनावाच्या आद्याक्षरानुसार करण्यात आलेली आहे.
त्या उमेदवारांनी त्या उपकेंद्रावर सकाळी १० वाजता उपस्थित राहून संबंधित उपकेंद्राच्या केंद्र प्रमुखाची भेट घेवून आपले स्थान ग्रहण करावे.
सदर उमेदवारांनी स्वत:चा पासपोर्ट फोटो व फी भरल्याची पावती किंवा पुरावा याची प्रत (Xerox), ओळखपत्राची प्रत (Xerox) सोबत आणावी. परीक्षा सुरु होण्यापूर्वी प्रथमत: तेथे उपलब्ध करून देण्यात येणारे प्रवेशपत्र भरावे व त्यावर आपला फोटो चिकटवावा. तसेच तेथे उपलब्ध असलेले हमीपत्रही भरून द्यावे.
परीक्षेचा पहिला पेपर सुरु झाल्यानंतर प्रवेशपत्र, हमीपत्र, फी भरल्याची पावती किंवा पुरावा याची प्रत (Xerox), ओळखपत्राची प्रत (Xerox) समवेक्षकाकडे जमा करावी.
Original Announcement : announcement-14May2013


SIR, MALA AJUN PARAYANT HALL TICKET MILALE NAHI ANNI ME KHUP VAITAGALI AAHEMAZI BIRTH DATE 28/07/2013 RAGISTRATION NO.19031908137100111,CENTER -THANE
MAMI CADACHE NAME-PRATIKSHA GADHE
@समीक्षा, एमपीएससी शी संपर्क करावा.